प्रशासनाचा भोंगळ कारभार : कर्मचाऱ्यांना टपाल मतदानाची तरतूद नाही

 

चोपडा, प्रतिनिधी । प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजविणारे कर्मचारीच मतदानापासुन वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, येत्या १५ जानेवारीला ग्राम पंचायत निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या संपुर्ण महाराष्ट्रभर आहेत. यात जळगाव जिल्ह्यातिल ग्राम पंचायतींचा देखील समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेत शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र जळगाव प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो कर्मचारी मतदानसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व पवित्र हक्कापासुन वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

येत्या १५ तारखेला होऊ घातलेल्या ग्रा.प. निवडणुकीसाठी मतदान आहे. त्याकामी शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला निवडणुक कर्मचारी म्हणून नियुक्त केले आहे. त्याचे दोन प्रशिक्षण सत्रही जवळजवळ पुर्ण झालेले आहेत. मात्र यात जिल्हा प्रशासनाने म्हणजे निवडणुक विभागाने पोस्टल मतदानाची तरतूद केली नाही. स्थानिक शासनात ग्रा.प.निवडणुकीत शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी मार्गदर्शकाची भूमिका बजावतो व लोकांना व गावाला दिशा देण्यासाठी सहभागी होतो. अशा लोकांचा निवडणुक प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रा. प. निवडणुकीत मतदानासारख्या पवित्र हक्कापासुन व राजकीय हक्कापासुन वंचित रहावे लागणार आहे. गावविकासाचा केंद्रबिंदू शिक्षकच गैरहजर असेल तर गावविकासाचा अडसर निर्माण होणार आहे. ही सर्वस्वी जबाबदारी ही निवडणूक यंत्रणेची आहे तरी संबधित राजकीय लोकांनी प्रशासनाला जाब विचारून सामान्य शैक्षणिक कर्मचारी वर्गाला त्याचा मतदानाचा हक्क मिळवून द्यावा अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रातील लोकांकडून होत आहे.

Protected Content