केंद्र सरकारला धक्का : आर्थिक विकास दर पाच टक्क्यांवर

images 1 3

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन बँकांसंबधी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली असतानाच केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाच्या आर्थिक विकास दरात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मध्ये विकासदर ५.८ टक्क्यांवरून थेट पाच टक्क्यांवर घसरला आहे. देशाचा विकास दर घसरला असून गेल्या वर्षभरात यात जवळपास तीन टक्के घसरण पहायला मिळाली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या जीडीपी पाच टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. मात्र आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी पाच टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीत हे आकडे समोर आले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण आठ टक्क्यांच्या पुढे होते. देशात मागणी कमी झाल्याने तसेच गुंतवणुकीसाठी परिस्थिती चांगली नसल्याने जूनच्या तिमाहीत जीडीपीत घसरण पाहायला मिळेल, असा अंदाज आधीच बांधण्यात आला होता.

Protected Content