मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात

मुंबई प्रतिनिधी । कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात कपात करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

करोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज याबाबत माहिती दिली.

याच् संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील अ आणि ब वर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. क वर्गाच्या कर्मचार्‍यांना ७५ टक्के वेतन दिले जाणार आहे. तर ड वर्गाच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात कोणतीही कपात होणार नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सरकारनं हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याप्रसंगी दिली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content