धक्कादायक : तब्लिगी जमातमध्ये दोन हजार लोक सहभागी ; ३०० जणांमध्ये दिसली कोरोनाची लक्षणं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या निझामुद्दीन भागात २३ मार्चला तब्लिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या दोन हजार लोकांपैकी तब्बल ३०० लोकांमध्ये  कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे प्रशासन हादरले आहे.

 

या घटनेनंतर पोलिसांनी निझामुद्दीन भागाची नाकेबंदी करत वर्दळ थांबवली आहे. जमातमध्ये सहभागी दोन वृद्धांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनुसार विनापरवानगी आयोजित तब्लिगी जमातमध्ये देश-विदेशातील सुमारे ३०० लोक आले होते. जमातमध्ये सहभागी ६० वर्षांवरील सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सहा जण पॉझिटिव्ह आहेत. मात्र, जमातचे प्रवक्ते शोएब अली यांनी पॉझिटिव्ह असल्याचा इन्कार केला. तर तामिळनाडूतून आलेल्या ६३ वर्षीय मसगीर यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर काश्मिरातील सोपोरहून आलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा गेल्या आठवड्यात श्रीनगरमध्ये मृत्यू झाला होता.

Protected Content