कोरोना लॉकडाऊन : विनाकारण फिरणाऱ्या पाच हजार जणांवर गुन्हे दाखल !

सोलापूर (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात मागील पाच दिवसात विनाकारण फिरणाऱ्या तब्बल पाच हजार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून सार्वजनिक वाहतूक, दुकानं, शाळा, कॉलेज आणि कंपन्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. पण असे असतानाही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनी 23 ते 30 मार्च दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विनाकारण मोटारसायकलवर फिरणे, अफवा पसरविणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Protected Content