जळगावात सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी सायकल रॅलीव्दारे घेतले नऊ देवींचे दर्शन

जळगाव प्रतिनिधी । नवरात्रोत्सवानिमित्त, आज (दि.१४) जळगावातील सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील नौ देवीच्या मंदिराला सायकलद्वारे भेट देण्याचे आयोजन केले होते. दरम्यान, जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवली या उद्देशाने रॅलीचे आयोजन केले होते.

याप्रसंगी सायकलपटू व जिल्हा नियोजन अधिकारी असलेले प्रतापराव पाटील यांनी सहभागी असलेल्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी सायकलिंग करावी व स्वतःला व परिवाराला तंदुरुस्त ठेवावे जसा वेळ आपणास मिळेल तसे सायकल चालवावी व शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले

देवीच्या दर्शनासाठी सायकल रॅलीची सुरुवात महाबळ मधील मायादेवी मंदिर  येथून सकाळी  05.45 वाजता झाली, तेथून मेहरून तलाव देवीचे मंदिर, इच्छापूर्ती देवी मंदिर , इच्छादेवी मंदिर , मनुदेवी मंदिर- एमआयडीसी, कालिका माता मंदिर – एमआयडीसी, महालक्ष्मी मंदिर – सुभाष चौक, गायत्री माता मंदिर – बालगंधर्व मागे व रॅलीची सांगता भवानी देवी मंदिर – पिंप्राळा येथे झाली.

या सायकल रॅलीत प्रतापराव पाटील, सुनील चौधरी, सुभाष पवार, विनोद पाटील, अमोल कुमावत, अमोल देशमुख, रुपेश महाजन, अतुल सोनवणे, संदीप शर्मा,  उज्ज्वल पडोळे, सखाराम ठाकरे, आशिष पाटील, मोतीलाल पाटील, श्याम वाणी, राजेश काळे, जितेंद्र दांडगे, कामिनी धांडे, विद्या बेंडाळे, आशा चोपडे, रसिका भोळे, अमृता अमळनेरकर, जया व्यास, तृप्ती शाह, माधवी मुळे, हेतल चव्हाण  व धनश्री चौधरी  यांनी सहभाग घेतला. सर्व सायकल पटूसाठी प्रसाद व अल्पोपहाराची व्यवस्था जलेबी जंक्शन चे जया व्यास व दर्शन व्यास यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!