राऊतांच्या जोडीला सावंत मुख्य प्रवक्ते

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या प्रवक्तेपदांची नवीन यादी जाहीर करण्यात आली असून यात संजय राऊत यांच्या जोडीला अरविंद सावंत यांच्यावर प्रमुख प्रवक्ते ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे . यात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्त्यांबरोबर अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यात खासदार प्रियंका चतुर्वैदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत.

त्याचसोबत महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Protected Content