मविआच्या नेत्यांचा दावा फोल- सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या निवडणुक निकालापुर्वीच आमचे चारही उमेदवार विजयी होतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र, कोल्हापूरचे भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजयाच्या निकालानंतर मविआच्या नेत्यांचा दावा फोल ठरला असल्याची टीका भाजपचे किरीट सोमय्या यांनी केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या अनपेक्षित विजयानंतर भाजपा गटात जल्लोषाचे वातावरण आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांना प्रबळ उमेदवार मानले जात होते. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असूनही भाजपाने सहाव्या जागेवर उमेदवार देत धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणले. यात शिवसेनेचे कोल्हापुराचेच उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर आमच्या तिसऱ्या उमेदवाराला संजय राऊतांपेक्षाही जास्त मते मिळाली असल्याचा खोचक टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

तर आम्हीच जिंकलो असतो.-राऊत

भाजपाने सहावी जागा जिंकली असली तरी त्यांचा विजय झाल्याचे मी मानतच नाही. परंतु भाजपाकडून मात्र, हा मोठा विजय असल्याचे चित्र निर्माण केले जात असून दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडिकांचा विजय झाला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला असता तर आम्हीच जिंकलो असतो. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर माध्यमांना दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!