मंत्रालयात न जाणार्‍या घरकोंबड्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे का? : भातखळकर

मुंबई प्रतिनिधी । सरकारने लेटलतिफांसाठी नवी नियमावली लागू केली आहे. मात्र, मंत्रालयात न जाणार्‍या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का? असा खोचक प्रश्‍न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

सरकारी कर्मचार्‍यांच्या उशिरा येण्यामुळे अनेक नागरिकांना तासनतास खोळंबून बसावे लागते. मात्र आता या सरकारी लेटलतिफांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. या नियमांनुसार उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार कापण्यापासून ते त्यांच्या सुट्ट्या कापण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार एका महिन्यात तीनपेक्षा अधिक दिवस कामावर उशिराने पोहोचल्यास एक दिवसाची सुट्टी कापली जाणार आहे. तसेच महिन्यातून ९ पेक्षा अधिक वेळा कामावर उशिरा आल्यास कर्मचार्‍याला महिन्याला मिळणार्‍या सुट्ट्यांमध्ये कपात केली जाणार आहे.

या निर्णयावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कामावर उशिरा येणार्‍या लेटलतिफांना चाप, सरकारकडून नवी नियमावली जाहीर आणि मंत्रालयात न जाणार्‍या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का? असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

 

Protected Content