कंगना व उर्मिलामध्ये पुन्हा जुंपली !

शेअर करा !

मुंबई प्रतिनिधी । अभिनेत्री कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात पुन्हा जुंपली असून या वेळेस कंगनाने उर्मिलाच्या महागड्या ऑफिसबाबत प्रश्‍न उपस्थित केला. तर उर्मिलानेही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने खार येथे नवे कार्यालय खरेदी केले आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी आहे. यावरुनच कंगनाने उर्मिलास सोशल मीडियावर डिवचले आहे. ‘भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. पण उर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला. उर्मिलाजी मी स्वतःच्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस माझे घर तोडत आहे, असा आरोप कंगनाने केला आहे. शिवाय, भाजपला खूष करुन माझ्या हातात फक्त २५ ते ३० न्यायालयातले दावे पडले. मी तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खूष केले असते,’ असा टोला कंगनाने लगावला आहे.

या टीकेवर उर्मिलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कंगनाला प्रत्युत्तर दिले. ‘कंगनाजी, माझ्या बाबतीतचे तुमचे विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशाने ऐकले आहेत. संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रे घेऊन मी येते. या कागदपत्रांमध्ये २०११ मध्ये स्वतःच्या मेहनतीने अंधेरीत सदनिका विकत घेतल्याचा पुरावा मिळेल,’ असा खुलासा उर्मिलाने केला आहे.

‘२० – ३० वर्षांच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मार्च २०२० मध्ये टाळेबदीच्या पूर्वी ती सदनिका विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे आहेत. त्याच पैशातून मी विकत घेतलेल्या नव्या कार्यालयाची कागदपत्रे आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून कार्यालय विकत घेतले आहे, हेही मी दाखवेन,’ असा खुलासा उर्मिलाने केला आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!