Home राज्य शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे विद्यापीठात होणार !

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे विद्यापीठात होणार !

0
1


पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन दि. २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत चार दिवस चालणार असून, ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात त्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.


Protected Content

Play sound