बोदवड येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन

bodwand news

बोदवड प्रतिनिधी । दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा येथील श्रीराम फाऊंडेशनच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन 16 जुलै रोजी करण्यात आले आहे. सोहळ्याबाबत श्रीराम पाटील, गोपाल दर्जी, दीपक नगरे, आबा माळी, दीपक पटेल, बंडू पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

शैक्षणिक वाटचालीत दहावी आणि बारावी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटा आणि नवीन दिशा मिळत असतात. त्यांचे मिळालेले यश आणि त्यांना योग्य मार्गदर्शन यांची सांगड बसविणे गराजेचे असते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक होणे समाजमनाचे कर्तव्यच आहे. याचे भान ठेवून श्रीराम उद्योग समूहाचे सेवाभाव अंगिकारून श्रीराम फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक यांचा गुण गौरव सोहळा 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शहरातील मुक्ताई भवनात ठेवण्यात आला आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील हे राहणार असून नगराध्यक्ष हाजी सै बागवान व सार्वजनिक को ऑप सोसा चेअरमन मिथुलाल अग्रवाल यांच्याहस्ते वृक्षपुजन करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आर.आर.जोगी, गट विकास अधिकारी डिगंबर लोखंडे, पोलीस निरीक्षक सुनील खरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, गट शिक्षणाधिकारी श्री लहासे, साहित्यिक अ. फ. भालेराव, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र लढ्ढा, हरीश मुंदडा, डॉ उद्धव पाटील, सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्रीरंग फिरके, रमेश सुरंगे, दर्जी क्लासेस चे संचालक गोपालजी दर्जी, संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील, सोहळ्यास उपस्थित राहणार असून गुणवंत विद्यार्थी पालक आणि शिक्षक बांधवांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी दीपक नगरे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

Protected Content