प.वि.पाटील व ए.टी झांबरे विद्यालयात महामानवाला अभिवादन

 

जळगाव प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय तसेच ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच मुख्या. डी. व्ही. चौधरी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शाश्वत कुलकर्णी , सृष्टी कुलकर्णी तसेच अनुश्री चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भाषणे दिली तसेच कविता सादर केल्या.

०६ डिसेंबर ५६ साली बाबा तुम्ही निघून गेले, जाता जाता आमचे भविष्य घडवून गेले, दीन दलित बहुजन पोरके झाले, तुम्हाला आठवून डोळे भरुन आले, तुम्हाला आठवून डोळे भरुन आले.

तसेच उपशिक्षक योगेश भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे चित्र विद्यार्थ्यांसमोर आपल्या भाषणातून उभे केले तर सहा डिसेंबर छप्पन साली…. या गीतातून महामानवाला अभिवादन केले.

कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका स्वाती पाटीलअशोक चौधरी, डी. ए.पाटील, सतीश भोळे यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content