Home क्राईम जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी लंपास

जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी लंपास

0
56
two wheelar thift

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांना घेण्यासाठी आलेल्या प्रौढाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 29 रोजी घडली असून याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ लक्ष्मण पाटील वय-60 रा. शिवकॉलनी जळगाव हे जिल्हा परीषदेत कक्षाधिकारी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. मुलीला घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच 19 एडब्ल्यू 367) ने रेल्वे स्टेशनला सकाळी 6 वाजता आले. दुचाकी रेल्वे स्टेशनला पार्कींग करून लागली. मुलीला घेवून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर मिळून आली नाही.सर्वत्र शोधाशोध केली तरीही मिळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound