जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी उद्यानाजवळील जलतरण तलावासाठी लागलेल्या ईलेक्ट्रीक मोटारसाठी लागणाऱ्या 24 रूपये किंमतीच्या वायरी कापून चोरून नेल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. या गुन्ह्यातील संशयित म्हणून एकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवाजी नगर उद्यानाजवळील महानगपालिकेचा जलतरण तलावासाठी लागणाऱ्या पाणी फिल्टरसाठी ईलेक्ट्रिक मोटारची तांब्याची असलेली 20 हजार रूपये किंमतीच्या 60 मिटर वायर आणि 4 हजार रूपये किंमतीचे कॅपसिटर अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याचा प्रकार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी मॅनेजर नरेश भोसले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर टिपू उर्फ बहिऱ्या सलीम शेख (वय-25) रा. बिस्मिल्ला चौक, तांबापूर याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील वायर हस्तगत करण्यात आली आहे.