नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | नूतन मराठा महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष,आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने नूतन मराठा महाविद्यालय व क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दि. 9 एप्रिल 2022 रोजी क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या परिषदेचे उद्घाटक म्हणून  क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही. एल. माहेश्वरी हे उपस्थित राहणार आहेत.  या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय व्याख्याता डॉ.सुजाता सिंघी व अध्यक्ष म्हणून क.ब.चौ.उ.म.वी.चे व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख हे असणार आहेत. प्रा. डॉ. एम. डी.जहागीरदार, औरंगाबाद,प्रा.डॉ. माया इंगळे इंदौर, प्रा.डॉ.अनिल चिकाटे, प्रा. डॉ. पी. एस. कुलकर्णी औरंगाबाद, प्रा. डॉ. शाम साळुखे आदींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेसाठी 450 प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांची नोंदणी
या परिषदेसाठी जगभरातून एकूण 450 प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातून 235 संशोधन पेपर आलेले आहेत. या परिषदेसाठी मुख्य नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख हे असून, परिषदेचे संयोजक प्रा.डॉ.ए.वाय.बडगुजर व परिषदेचे आयोजन सचिव प्रा.बी.सी.पाटील हे आहेत. यासोबत सदस्य म्हणुन प्रा.डॉ.एन.जे.पाटील, प्रा.डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.डॉ.सौ.इंदिरा पाटील प्रा.डॉ.एस.व्ही.पडलवार, प्रा.एन.बी.बाविस्कर, प्रा.डॉ. डी. आर. चव्हाण, प्रा. डॉ. राहुल संदानशिव, डॉ. माधुरी पाटील याशिवाय उपसमित्या कार्यरत आहेत. परिषदेच्या समारोपासाठी क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे हे उपस्थित राहणार आहेत.

 

डॉ. सुजाता सिंघी यांचे साउंड अँड म्युसिक अज अ मेडिसिन विषयावर व्याख्यान

नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या डॉ. सुजाता सिंघी यांचे साउंड अँड म्युसिक अज अ मेडिसिन या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दि. 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता कांताई सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे. डॉ.सुजाता सिंघी या आंतरराष्ट्रीय लेखिका, वक्त्या, कॉर्पोरेट वेलनेस, लिडर शिप ट्रेनर तसेच साउंड ऍण्ड स्पिरिचुअल सायंटिस्ट आहेत. खान्देशात पहिल्यांदाच त्यांचे व्याख्यानाचे आयोजन होत आहे. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.सुजाता सिंघी यांच्या Reclaim Your Riches या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/346087507482021

 

Protected Content