पारोळा आणि एरंडोल येथे रास्ता रोको आंदोलन 

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत पारोळा आणि एरंडोल येथे रास्ता रोको आंदोलन  करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली पारोळा आणि एरंडोल येथे किरीट सोमय्या यांचा पुतळा दहन करण्यात आला. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी पारोळा येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आर.बी., शहरप्रमुख अशोक मराठे, अण्णा चौधरी बापू मिस्त्री, विवेक माळी, भरत सोनवणे, सुनीलभाऊ पाटील, प्रवीण हटकर, अमोल पाटील, सुयश पाटील

एरंडोलमध्ये वासुदाद.ता.प्रमुख मानुधने, हेमंत पाटील, प्रमोद महाजन, देशमुख, अनिल महाजन, गणेश महाजन, करण पाटील, गजू महाजन, संदिप पाटील, निंबा पाटील, रुपेश माळी यासह कार्यकर्ते उपस्थित होते. नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचे किरीट सोमय्या यांनी काय केलं ? जमा लेला पैसा कोणाच्या खिशात गेला ? हा पैसा कोणी खाल्ला ? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळायलाच हवीत. या घोटाळ्यात किरीट सोमय्यांने अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायात गुंतवले आहेत त्यामुळे देशद्रोही किरीट सोमय्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा.’ अशा आशयाचे निवेदन  तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

Protected Content