केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन तातडीने स्थलांतरितांचा प्रश्न सोडवावा : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील स्थलांतरित मजुरांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकारने भरारी पथके स्थापन करावेत. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन तातडीने स्थलांतरितांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. शरद पवार यांनी औरंगाबाद येथील रेल्वे अपघातात १६ मजूर ठार झाल्याच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

 

औरंगाबाद येथे रेल्वे अपघातात १६ मजूर ठार झाल्याची दुर्देवी दुर्घेटनेवर शरद पवार यांनी दु:ख व्यक्त करतांना आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटतील मजुरांच्या मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही, तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत. राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाटी भरारी पथकांची नियुक्ती करावी. तसेच या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा. एवढेच नव्हे तर, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन तातडीने स्थलांतरितांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी सूचना देखील शरद पवार यांनी केली आहे.

Protected Content