भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना दिलासा : चार्जशीट दाखल न करण्याचे निर्देश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे गोत्यात आले होते. या प्रकरणावरून गदारोळ झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर याच प्रकरणावरून खडसे पती-पत्नीसह त्यांचे जावई देखील अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांचे जावई गिरीश चौधरी हे कारागृहात असून खडसे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका एकनाथराव खडसे यांनी उच्च न्यायालयात केली होती. यावर आज निकाल लागला असून यामध्ये न्यायालयाने एकनाथराव खडसे यांची या प्रकरणात चौकशी करता येईल, तथापि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू नये अथवा त्यांना अटक करू नये असे निर्देश कोर्टाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिले आहेत. यामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Protected Content