लायन्स क्लबतर्फे मु.जे. महाविद्यालयातील सेंटरला व्हिल चेअर आणि वॉकर भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लायन्स क्लब जळगाव तर्फे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ड्रीमि आईज रिसोर्स सेंटर फॉर डिफ्रंटली एबल्ड, या सेंटरला व्हिल चेअर आणि वॉकर देणगी स्वरूपात देण्यात आले.

याप्रसंगी सेंटरमार्फत त्यांच्या सत्कारासाठी एक सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केसीई सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे संचालक डॉ. हर्षवर्धन जावळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष किरण गांधी, सेक्रेटरी प्रशांत चंदिवाल व लिओ क्लबचे सदस्य नयन गांधी व विनोद राका आणि सेंटरचे प्रशासकीय समन्वयक व्ही एस कंची व शैक्षणिक समन्वयक सहाय्यक प्रा. आकाश राठोड व मूळजी जेठा महाविद्यालयाच्या दिव्यांग समितीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content