राहूल-प्रियंकांसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी

हाथरस वृत्तसंस्था । राहूल गांधी व प्रियंकांसह पाच जणांना हाथरस येथील पिडीत तरूणीच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी युपी सरकारची नाचक्की झाली आहे. प्रसारमाध्यमांसह विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून योगी सरकार बॅकफुटवर दिसून येत आहे. दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते. परंतु आता युपी सरकारने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, त्यांना करोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने आता प्रशानानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.