आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबाला”उभारी” देण्यासाठी प्रशासन त्यांच्या “दारी”

 

रावेर, शालिक महाजन । आदिवासी भागात गारखेडा येथील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबास उभारी देण्यासाठी प्रांतधिकारी व तहसीलदार त्यांच्या पाड्यावर पोहचले प्रशासन आपल्या दारी बघुन आत्महत्या केलेले रेमसिंग बारेलाचे कुटुंब प्रचंड भावुक झाले. त्यांच्या घरची अठराविश्व दारिद्र बघुन दोघेही जबाबदार अधिका-यांनी महसूलचे चक्र वेगाने फिरवत त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रशासन कामाला लावले व जवळुन त्यांच्या कुटुंबाना जवळुन आर्थिक मदत सुध्दा केली. 

ही घटना या वर्षीच्या फेब्रुवारीतील आहे.  रेमसिंग बारेला आपल्या आई,पत्नी व तीन मुलांसह गारखेडाच्या पाड्यावर राहत होता. त्याच्याकडे असलेल्या शेतीच्या उत्पन्नवर आपले व आपल्या परीवाराचे उदारनिर्वाह चलावत परिवाराचे पोट भरत होतो. यंदा रेमसिंगने रब्बीच्या हंगामासाठी एक लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु यंदा दुष्काळामुळे उपन्न काहीच न आल्याने रेमसिंग निराश झाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अश्या कुटुंबाना पुन्हा उभारी देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहे.  शुक्रवारी प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले तहसिलदार उषाराणी देवगुणे अतिदुर्गम गारखेडा या त्यांच्या पाड्यावर घरी पोहचल्या आणि सुरु झाला त्यांना मदत आणि त्यांच्या मदतीसाठी योजनांची पडताळणी प्रांतधिकारी व तहसीलदार आपल्या दारी बघुन बारेला कुटुंब सुध्दा अचंबित झाले होते.

हे सर्व शासकीय अधिकारी आपल्या मदतीसाठी आल्याचे कळताच बारेला कुटुंब चांगलच भावुक झाले.त्यांची अठराविश्व दारीद्र बघुन तर स्वता : थोरबोले यांनी त्यांना आर्थिक मदत केली व त्यांच्या कुटुंबाना रेशन पासून ते पेंशन पर्यंत पडताळणी सुरु झाली मदत पासून ते दिलासा मिळे पर्यंत संपूर्ण योजनांची मदत त्यांना मिळवुन देण्यासाठी महसूल टिम चे चक्र फिरवत कामाला लावले अश्याच पध्दतीने तालुक्यात इतर ठिकाणी घरचा कर्ता गेलेल्या शेतक-यांना महसूल प्रशासन उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी गुणवंत बारेला ग्रामसेवक डी एम वळवी,कृषी साहाय्यक सिकंदर तडवी , सरपंच जुवानसिंग बारेला उपसरपंच इरफान तडवी , गाठू बारेला आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Protected Content