राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महामानवास अभिवादन व बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . सोमवार, दि.६ डिसेबर रोजी सकाळी ११ वाजता बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. ते म्हणाले की, “डॉ.आंबेडकरांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग” अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केले असल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरतर्फे १०० गरजू व विधवा महिलांना साड्या वाटप, फुटपाथवरील १०० निराधार गोरगरीबांना ब्लँकेट वाटप, ५०० होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, ५० होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शहरात विविध ठिकाणी शाखांचे उदघाटन, शाखांचे नियोजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सद्स्यता नोंदणी अभियान आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण अभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे फळवाटप आदी. समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात सकाळी 10 वाजुन 10 मिनिटांनी केक कापून आणि १ ते २ यावेळेत स्क्रिनवर शरद पवार व पक्षातील विविध नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल, वाल्मिक पाटील, अश्विनी देशमुख, परवेज शेख, वाय एस महाजन, अशोक पाटील, मजहर पठाण, अरविंद मानकरी, प्रतिभा शिरसाठ, अमोल कोल्हे, डॉ.रिजवान खाटिक, किरण राजपूत, रमेश बाऱ्हे, दिलीप माहेश्वरी, सुशील शिंदे, जितेंद्र बागरे, सुदाम पाटिल, विशाल देशमुख, नईम खाटिक, अकिल पटेल, जितेंद्र चांगरे, प्रतिभा शिरसाठ, शुभम बनसोडे, मिनाक्षी पाटील, मनीषा चव्हाण, राहुल टोके, जयेश पाटील, रहीम तडवी, दिपीका भामरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Protected Content