कानळदा रस्त्यावरील बिअरशॉपी मालकास मारहाण; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । ‘पोलिसांना बातम्या का देतो’ याचा संशय आल्याने शिवाजी नगरातील कानळदा भागात एका बिअरशॉपीजवळ एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरीओम नगरातील योगेश गोपाळ साळी (वय-३२) यांचे खूशी बिअर शॉपी कानळदा रस्त्याला लागून आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास संशयित आरोपी टक्कल लोहार, संदीप ठोके रा. लक्ष्मी नगर यांनी पोलिसांना बातम्‍या का देतो? असे साळी यांनी हटकले असता शाब्दिक बोलचाली होवून योगेश साळी यांना दोघांना मारहाण करून जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. तसेच दुकानारील वस्तूंची तोडफोड केली. योगेश साळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content