चुंचाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा सुनंदा पाटील!

यावल, प्रतिनिधी| तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपूर्वी सरपंच पदाविरुद्ध अविश्वास आल्यानंतर आज लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यात सुनंदा पाटील ह्या दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत.

यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सदस्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी  अविश्वास प्रस्ताव तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. व तो पारित देखील झाला. मात्र, लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी अनिवार्य असल्याने  जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने आज १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पिठासिन अधिकारी पी. टी. देवराज, ग्राम विस्तार अधिकारी हबीब तडवी व ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली. यात सरपंचाविरूद्ध आणलेल्या ९ ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाच्या विरूद्ध झालेल्या मतदानात  एकुण २२९२ मतदारांपैक्की११३० असे एकुण ५२ टक्के % मतदान झाले . यात सरपंच सुंनदा पाटील यांना ६८४ तर सदस्यांच्या गटाला एकुण २१६ मते मिळाली. तर २३० मतदान हे बाद झाली. सर्वांचे लक्ष्य लागलेल्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीकडे निकाल जाहीर होताच दुसर्यांदा सरपंचपदाच्या दावेदार सुंनदा पाटील ह्या ठरल्या. लोकनियुक्त सरपंच पदांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा मतदान करण्याची ही राज्यातील दुसरी तर जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावरील ही प्रथमच कार्यवाही आहे.याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुण होते. पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, सहा. फौ. विजय पाचपोळे व इतर पोलीस कर्मचार्यांच्या उपसातीतीत हे मतदान पार पडले. दरम्यान सुंनदा पाटील ह्या दुसऱ्यांदा विजयी ठरल्याने माळ घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

Protected Content