नांद्रा येथील किशोर पाटील यांच्या स्वखर्चातुन समाजाभिमुख कामांना हातभार

सैन्य भर्तीच्या तरुणांना धावपट्टी तर स्मशान भुमीच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार

पाचोरा प्रतिनिधी । सैन्य भतीच्या तरूणांना शारीरिक चाचणीसाठी सराव करण्यासाठी चांगले मैदान व धावपट्टीची आवश्यकता असते. मात्र मैदानाच्या अभावी तरूणांना सराव करता येत नाही. तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी स्वखर्चाने तरूणांसाठी सराव करण्यासाठी भराव टाकून, रोलिंक करून चांगले मैदान व धावपट्टी तयार करून दिले आहे.

तालुक्यातील नांद्रा येथील किशोर पाटील यांनी काढलेल्या खडतर प्रवासातुन घेतलेली झेप यशस्वी होत त्यांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य लाभत असतांनाच समाजाचे अस्तित्व व्यक्तीवर व व्यक्तीचे पूर्णत्व समाजावर अवलंबून असते असा आदर्श वस्तुपाठ जपत आपणही समाजाच्या कामी यावे म्हणुन त्यांनी येथील सैन्य भर्तीचा सराव करणाऱ्या तरुणांना शारीरिक चाचणीची तयारी करत असतांना मैदानावर दगड गोट्यांचा सामना करावा लागत होता. त्यांची मेहनत व चिकाटी पाहुन येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर प्रकाश पाटील यांनी त्यासाठी धावपट्टी निर्माण करुण देत तेथे मुरुमाचा भराव, रोलींग, टँकरने पाणी पुरवठा यासोबतच संपुर्ण ग्राऊंडवर वृक्ष लागवड करत वातावरणही प्रसन्न ठेवण्याची तजवीज केली. आगामी काळात होऊ घातलेल्या पोलिस भर्ती साठी येथील तरुणांमधे मोठा उत्साह आहे. येथील तरुण शारीरिक मेहनतीबरोबरच किशोर पाटील यांचे लहान बंधू घनश्याम पाटील यांच्या अग्निपंख क्लासेस च्या माध्यमातुन मार्गदर्शन घेत आहे. त्यामुळे तरुणांची भर्तीपूर्व तयारीची पूर्ण तजवीज झाल्याने त्यांच्यात भरतीत यशस्वी होण्याची वेगळीच सकारात्मकता निर्माण झाली आहे.

स्मशानभूमी परिसराची केली साफसफाई
किशोर पाटील यांनी स्मशानभुमी विकासाचा सुद्धा विळा उचलला आहे. येथील वृक्षांना ओटे, जे बसण्यासाठी उपयोगी पडतील, दशक्रीया विधीसाठी पाण्याची टाकी व पाईप लाईन हे कामे स्वखर्चातुन त्यांनी केले आहेत. त्यांच्या या सेवाभावी व समर्पित कार्याचे जनमाणसांतून स्वागत केले जात आहे. भविष्यात लोक सहभागातुन स्मशानभुमीत पेव्हरब्लाँक बसवुन या परिसरास वालकुंपन करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणा बरोबरच अंतर्गत सुशोभिकरणाचे कामे करण्याचा त्यांच्या मानस आहे.

कोट
समाजात जगतांना आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने समाज कार्य करण्यासाठी मला माझ्या अंतर्मनातुन प्रेरणा मिळते. व आत्मीक समाधान लाभत असल्यामुळे मी हे सर्व सामाजिक कार्य करत असतो.
-किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते, नांद्रा (ता.पाचोरा )

Protected Content