Home Cities यावल आदर्श क्रीडाशिक्षक मुख्याध्यापक पुरस्कारासाठी के.यु.पाटील यांची निवड

आदर्श क्रीडाशिक्षक मुख्याध्यापक पुरस्कारासाठी के.यु.पाटील यांची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडाशिक्षक महासंघ यांच्या वतीने यावल तालुक्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले मुख्याध्यापक के. यु. पाटील यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी आदर्श क्रीडाशिक्षक  मुख्याध्यापक सन्मानाने गौरविले जाणार आहे.

 

जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघ चे सचिव राजेश जाधव यांनी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.  के.यु.पाटील यांच्या पुढील कार्याची दखल घेऊन  त्यांना गौरवण्यात येणार आहे. क्रीडा समन्वयक यावल तालुका शासकिय क्रीडा स्पर्धाअध्यक्ष ( यावल तालुका ), महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघ (विविध उपक्रम), यावल तालुका शासकिय क्रीडास्पर्धा (दरवर्षी) राजकिय सामाजिक व्यक्तीकडुन आयोजित मँरोथोन स्पर्धा, आमदार चषक शिक्षक क्रीडास्पर्धा, सी.एम. चषक चला खेळुया फुटबॉल मिशन युवा जागर वत्कृत्व स्पर्धा, Fit India Movement अंतर्गत क्रीडा सप्ताह शारीरिक चाचणी प्रशिक्षण, राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण घेऊन जिल्हास्तरीय क्रीडाशिक्षकाना प्रशिक्षण दिले.

 

सामाजिक क्षेत्रात विविध पदाधिकारी म्हणुन जबाबदारीने रक्तदान शिबिरा, विद्यार्थी गुणगौरव सामारंभ व समाजउपयोगी मदतीचे आयोजन असे कार्यत्पर मुख्याध्यापक के यु पाटील याचे यावल तालुक्यातील क्रीडा शिक्षक यांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound