पाचोऱ्यातील हप्तेखोर पोलीस, मुख्यालयात कधी जमा होणार ?

beneficiaries clipart bribery

पाचोरा, प्रतिनिधी | पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्हाभरातील हप्ते वसुलीत लिप्त असल्याचा संशय असणाऱ्या ७२ पोलिसांना मुख्यालयात जमा केले आहे. मात्र या ७२ पोलिसांच्या यादीत पाचोरा तालुक्यातील एकही पोलीस नसल्याने आचर्य व्यक्त होत आहे.

 

पाचोऱ्यातही सट्टा, पत्ता, जुगार, अवैध वाळू वाहतूकीसह विविध अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते वसुली होतच नाही का ? की अवैध धंदे सुरुच नाहीत ? असे प्रश्न उपस्थीत होत आहेत. कारण येथील पोलीस स्टेशनलाही कलेक्शन जमा करणारे दोन-तीन पोलीस असल्याची चर्चा असून पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Protected Content