४५ वर्षीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

पाचोरा पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील एका ४५ वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील फिर्यादी विरुध्ददेखील आरोपींनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील अलकाबाई बाबुलाल धिवरे (वय – ४५) यांनी गावातील दौलत देशमुख यांच्या जागेवरुन सोनाबाई कैलास गढरी यांनी दगड उचलून नेल्याचे सांगण्याच्या संशयावरुन आरोपी सोनाबाई कैलास गढरी, दिपाली कैलास गढरी, कैलास नारायण गढरी व परमेश्वर कैलास गढरी सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादी अलकाबाई बाबूलाल धिवरे यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाठ्या काठ्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण करत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने अलकाबाई बाबुलाल धिवरे यांच्या फिर्यादीवरून सोनाबाई गढरी, दिपाली गढरी, कैलास गढरी व परमेश्वर गढरी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे हे करत आहेत.”

आरोपींचाही फिर्यादीसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आखतवाडे ता. पाचोरा येथील सोनाबाई कैलास गढरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून “रविंद्र बाबुलाल धिवरे, अमोल बाबुलाल धिवरे व अलकाबाई बाबुलाल धिवरे सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरोळ्या मारत शिवीगाळ करत असतांना त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या सोनाबाई गढरी यांना आरोपी रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलकाबाई धिवरे यांनी घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन फिर्यादीस मारहाण करत यातील रविंद्र धिवरे व अमोल धिवरे यांनी सोनाबाई गढरी यांच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने सोनाबाई गढरी यांच्या फिर्यादीवरून रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलकाबाई धिवरे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास पाटील हे करत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!