सर्व शैक्षणिक संस्थांना एक ड्रेसकोड लागू करा : याचिका दाखल

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे विद्यार्थ्यांच्या पेहरावावरून वादंग उठले असतांना संपूर्ण देशभरातील शैक्षणिक संस्थांसाठी एकच ड्रेसकोड लागू करावा या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

कर्नाटकमधील हिजार प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटले असतांना सुप्रीम कोर्टात एका अनोख्या मागणीची याचिका दाखल झाली आहे. देशातील शाळा, महाविद्यालये ही ज्ञान, रोजगार देणारी आणि राष्ट्राचा विकास करणारी, त्यात योगदान देणारी केंद्रे आहेत. धार्मिक चालीरीती पाळणारी केंद्रे नाहीत. जर भविष्यात नागा साधूंनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर ते त्यांच्या धार्मिक चालीरीतींप्रमाणे कपडयांशिवाय कॉलेजमध्ये आले तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यासाठी देशभरात शाळा आणि महाविद्यालयांसाठी एकच ड्रेसकोड लागू करा, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

कायद्याचा विद्यार्थी निखिल उपाध्याय याने ही जनहित याचिका दाखल केली आहे. देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जातीयवाद, कट्टरता आणि विभाजनवादी शक्तीचा धोका वाढू लागला आहे. त्यावर उपाय म्हणून देशभरात सर्व शैक्षणिक संस्थांना एकच ड्रेसकोड लागू करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने एक न्यायालयीन आयोग नेमावा किंवा विशेषज्ञांची एक समिती नेमावी. ही समिती विद्यार्थ्यांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल, असे निखिल उपाध्याय याने जनहित याचिकेत म्हटले आहे.

Protected Content