बुलढाणा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’चा जिल्हास्तरीय लाभ वाटप

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  ‘शासन आपल्या दारी’चा बुलडाणा जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रम रविवार, 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता कऱ्हाळे ले आऊट जवळ, परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमागे, मलकापूर रोड येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

 

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत.

 

यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे

Protected Content