शिरसाड ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपुजन

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावात प्रभाग क्रमांक चारमध्ये आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून ५ लाखांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी पुर्ण झाली. यासोबतच, विविध विकास कामांचे आ. लताताई सोनवणे व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या भुमिपूजन करण्यात आले.

तसेच वॉर्ड क्रंमांक चार चे ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील व ज्योतीताई सोनवणे यांच्या मागणीवरून युवासेना तालुका प्रमुख प्रविण (गोटूभाऊ) सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांने सदर रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांची गेल्या २० वर्षापासून रस्त्याची मागणी होती. ती मागणी आता आमदारांच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच यावेळी वार्ड क्रं. चार मधील २६ ग्रामस्थांचे घरकुल प्रकरण गहाळ झालेली आहे. सदरच्या लाभार्थ्यांच्या जागा नावावर लावण्यास विलंब होत असल्याबद्दल ग्रामंस्थानी आमदारांकडे गाऱ्हाणे मांडले असता आमदारांनी तात्काळ यावल गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना दूरध्वनी करून येत्या दोन दिवसात सदर तक्रारदार ग्रामस्थांचे प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे सुचना आदेश दिले आहे.

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे मुख्य वापराचा रस्ता शिरसाड ते वढोदा फाटा या रस्त्याच्या सुमारे अडीच कोटी रु. किंमतीचे रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाउपप्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रवि सोनवणे, गटप्रमुख महेंद्र चौधरी, साकळीचे शिवसेना शाखाप्रमुख संतोष महाजन, प्रवीण माळी, पप्पु महाजन, शिरसाडचे माजी सरपंच प्रवीण (गोटुभाऊ) सोनवणे, माजी उपसरपंच धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, ज्योतीताई सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश सोनवणे ,आबा ठाकूर, लीलाधर धनगर, वासुदेव सोनवणे, विशाल इंगळे, किशोर इंगळे, भगवान सोनवणे, बापू पाटील यांच्या सोबत महिला वर्ग व ग्रामंस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आमदारांच्या प्रयत्नातून शिरसाड गावातील कोट्यावधीच्या विकासनिधीतून गावात रस्त्यांसह विविध प्रकारचे विकास कामे होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

Protected Content