युवक व कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा – आ.अनिल पाटील

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अमळनेर विधानसभा मतदारसंघात युवक व कार्यकर्त्यांच्या बळावर आपण राष्ट्रवादीचा आमदार दिला. मात्र, आमदारकीचा दर्जा मिळणे म्हणजे सर्व काही मिळणे नव्हे, तर या युवक व कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महापालिका, बाजार समिती आणि जि.प., पं.स. निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असे आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर येथे शरद संवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत सांगितले.

खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व प्रदेशाध्यक्ष ना जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘शरद युवा संवाद’ यात्रा निमित्ताने अमळनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली.या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.महेबूब शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सोबत रा.काँ.युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र  पाटील, एजाज मलिक, प्रशांत सपकाळ, प्रदेशाध्यक्ष ग्रंथालय सेल उमेश पाटील, बाजार समिती मुख्य प्रशासक सौ.तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, एल.टी.नाना पाटील, प्रा.सुरेश पाटील, शेतकी संघ मुख्य प्रशासक संजय पाटील, प्रदेश सरचिटणीस ग्रंथालय सेल रिता बाविस्कर.उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी कडे युवकांची घोडदौड वाढली आहे,या युवकांचे प्रबोधन आणि मार्गदर्शन तसेच युवकांकडून असलेल्या अपेक्षा,त्यांच्या कामाची पद्धत कशी ठेवावी हे सांगायला युवकचे प्रांत अध्यक्ष माहेबूब शेख आले आहेत,मा.शरदचंद्र पवार साहेब केवळ आपला पक्ष सांभाळणे आणि पक्षवढी साठी प्रयत्न न करता राज्य व देश  सांभाळत आहेत,आपण अभिमान करावा असे नेतृत्व आपल्याला लाभले आहे,त्यांच्या सारख वयोवृद्ध व्यक्तिमत्व  एवढे कार्य करीत असेल तर आपण युवकांनी देखील आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे,जो कार्यकर्ता जास्त मेहनत घेतो तो पुढे जातो,यापुढे उमेदवारीची सिस्टीम बदलवून जे कार्यकर्ते सांगतील त्यालाच उमेदवारी द्यावी हीच भूमिका पक्षाची असली पाहिजे,येणाऱ्या काळात सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहोत,आणि युवकांमधून उमेदवार देणार असू  तर युवकांची जबाबदारी वाढणार आहे तरी या संवाद यात्रेच्या माध्यमातून कामाला लागा,आपला गट,गण व गाव व शहरातील प्रभागात संपर्क वाढवा असे आवाहन आमदारांनी केले.

घराघरात राष्ट्रवादीचे विचार पोहचवा-प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी सुरवातीला अमळनेर पक्ष संघटनेचा आढावा घेतला त्या नंतर आपले मनोगत व्यक्त केले की मतदारसंघात प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा उघडून प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सांगितले पाहिजे. मा.शरदचंद्र पवार यांचे कार्य व त्यांनी आज पर्यंत केलेल्या लोक कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. प्रत्येक बुथवर 10 युवकांची फळी निर्माण केली पाहिजे,  युवकांनी ट्विटर, फेसबुक, व्हाँट्सअँप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट यांचा उपयोग करून आपल्या पक्षाची भूमिका व विरोधी पक्षाची खोटी आश्वासन आक्रमक पणे फेटाळून लावायला पहिजे, केंद्रात सत्ताधारी पक्ष भाजपच्या धोरणावर त्यांनी चौफेर तोफ डागली. तसेच राज्यातील सरकार सुरळीत सुरू असून राज्याच्या योजना तळागाळात पोहोचविण्याचे काम करून जास्तीत जास्त युवकांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात येण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी  व्यक्त केले.

जयवंत पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश

यावेळी पिंपळे रोड परिसरातील दमदार युवा कार्यकर्ते जयवंत पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला,त्यांचे आमदार अनिल पाटील व प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी पक्षात स्वागत केले. जयवंत पाटील यांच्या पाठीशी युवकांची मोठी फळी असून मोठे सामाजिक कार्य त्यांचे असल्याने आमदारांनी त्यांनी घेतलेल्या योग्य भूमिकेचे कौतुक केले.

यावेळी कविता पवार, महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी भामरे, आशाताई, विनोद कदम, पिंटू राजपूत, रणजित नाना, पंस.निवृत्ती बागुल, जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस गौरव उदय पाटील, जिल्हा सरचिटणीस निनाद शिसोदे, रा.यु.काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, रा.यु.काँग्रेस शहराध्यक्ष निलेश देशमुख, माजी शहराध्यक्ष इम्रान खाटीक, उमेश सोनार, राजेंद्र देशमुख, सचिन वाघ, श्रीनाथ पाटील, भूषण भदाणे, मुन्ना पवार, रोहित पाटील, नितीन भदाणे, योगेश देसले, सनी गायकवाड, प्रणव पाटील, सागर पाटील, संदीप सुतार, उमेश पवार, प्रकाश वाघ, राहुल गोत्राळ शिरीष पाटील ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्ते हजर होते.

 

 

Protected Content