सावदा येथील विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सावदा नं२ विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक कोरोनामुळे लांबली होती. परंतू शासन निर्णयानुसार नुकतीच घेण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

व संस्थेच्या चेअरमन  व व्हाईस चेअरमन पदासाठी दि. 12/2/2022 रोजी सभा रावेर तालुका सहकारी अधिकारी तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये चेअरमनपदी अतुल नेमाडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी पितांबर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सभेस संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य विलास इंगळे, सुभाष सरोदे, घन:शाम भंगाळे, गुणवंत वाघुळदे, विश्वनाथ फालक, निलीमा चौधरी, छाया वाघुळदे, हर्षल महाजन व राजेंद्र चौधरी हे उपस्थित होते. सदरील निवडणूक कामी सेक्रेटरी कांतीलाल पाटील यांचे सहकार्य लाभले.

 

 

Protected Content