Home धर्म-समाज अकलूदमध्ये युवा क्रांती फाउंडेशनचा अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी संघटनेचा निर्धार

अकलूदमध्ये युवा क्रांती फाउंडेशनचा अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी संघटनेचा निर्धार

0
7

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अकलूद येथील बीसीएम हॉलमध्ये सर्व जाती-धर्मातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे, गरजू नागरिकांच्या अडचणी सोडविणे आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने युवा क्रांती फाउंडेशन, पोलीस मित्र, ग्राहक, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेची विशेष आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासोबतच आगामी काळात महिला व बालकांवरील अत्याचारांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा तसेच पुढील महिन्यात जळगाव जिल्ह्यात भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष करताडसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक जोशी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे ही संघटनेची प्राथमिक जबाबदारी आहे. सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विनामूल्य सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेषतः महिलांवरील अन्याय, बालकांचे शोषण यांसारख्या गंभीर समस्यांवर दुर्लक्ष न करता पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, विविध तालुक्यांत संघटना विस्तार करणे, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे आणि जनहिताच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. पुढील महिन्यात होणाऱ्या भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून आगामी कार्याची दिशा निश्चित केली जाणार आहे. या आढावा बैठकीस महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली असून, महिलांच्या सहभागामुळे सामाजिक लढा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक जोशी महाराज, आकाश तेजराव जोशी, जळगाव जिल्हाध्यक्ष अशोक तायडे, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना रोटे, महिला उपाध्यक्ष पूजा राठोड, रंजना सोनवणे, मनीषा शिंदे, भुसावळ महिला तालुकाध्यक्ष मिठू मुखर्जी, यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ कोळी, चंदन चौधरी, रावेर तालुकाध्यक्ष पंकज महाजन, नितीन महाजन, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन चव्हाण, जामनेर शहराध्यक्ष ईश्वर चव्हाण, अंजू पवार, संतोष जोशी, सह संघटक अंकुश जोशी, युवा संघटक शेख इम्रान, संभाजी शिवाजी गंगावणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष समाधान निकम, उपाध्यक्ष पंकज खिरोडकर, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश बाविस्कर, शशिकांत तायडे, चोपडा अध्यक्ष राम जाधव, प्रवीण चव्हाण, यावल तालुका सचिव हनीफ खान, प्रसिद्धीप्रमुख ललित कपले, कार्याध्यक्ष गणेश पाटील, रुपेश कोळी, महिला अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे आणि चंद्रकांत तायडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत तायडे यांनी केले, तर आभार यावल तालुका महिला अध्यक्ष लक्ष्मी मेढे यांनी मानले.

Protected Content

Play sound