सहकार विद्या मंदिर स्कूल बस व आयशरची धडक

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील एआरडी मॉलसमोर सहकार विद्या मंदिर बसची व टाटा आयशरची धडक झाली. आयशर गाडीच्या चालकाने आणि स्कुल बसच्या चालकाने दोघांनीही अपघात होत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखत गाड्या खालच्या बाजूला टाकली. यामुळे बसमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एआरडी मॉलसमोर सहकार विद्या मंदिरची बस टाटा आयशर गाडीला धडकली. आयशर गाडीच्या चालकाने आणि स्कुल बसच्या चालकाने दोघांनीही अपघात होत असल्याचे पाहून प्रसंगावधान राखत गाड्या खालच्या बाजूला टाकल्यामुळे बस मधील सर्व विद्यार्थी सुरक्षित राहीले. 13 नंबरच्या या स्कुलबसमध्ये 17 बाल विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी आलेल्या बस एआरडी मॉल जवळील वळणावरून मागे शहराच्या दिशेने फिरतात. दुपारी 12:30 च्या दरम्यान 13 नंबरची बस मलकापूर रोडवरील विद्यार्थ्यांना उतरवून उर्वरीत 17 विद्यार्थ्यांसह शहराच्या दिशेने वळली.

याचदरम्यान दुभाजकाच्या पलीकडून सरकीच्या पोत्यानी भरलेले टाटा आयशरची आणि बस धडक झाली. अर्थात दोन्ही चालकांनी धोका ओळखल्यामुळे गती कमी केली आणि ब्रेक मारले. विशेष म्हणजे दोन्ही गाड्या रस्त्याच्या खाली उतरल्या आणि थांबल्या. सुदैवाने एकही विद्यार्थी क्षतिग्रस्त झाला नाही. बसमध्ये एकूण 17 विद्यार्थी होते. बसचालक स्वप्नील डवकेला मुका मार लागला आहे तर आयशर चालक सिराज खानच्या (रा. साखरखेर्डा)  पायाला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे आयशर चालकाला समोर स्कुल बस वळण घेत असल्याचे दिसल्यानंतर त्याने स्पीड कमी केलाच. परंतु आपली गाडी रस्त्याच्या खाली टाकली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व मुले सुरक्षित आहेत.

 

Protected Content