मनसेची आता हलालच्या विरोधात मोहीम

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हलाल मांसाच्या विरोधात मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ’नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेतली आहे. इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल अर्थात हलालला विरोध करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याची शक्यता मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही मोहीम राबविण्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे.

मनसेने महाविकास आघाडी सरकार असतांना मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात राज्यव्यापी मोहम राबविली होती. यानंतर आता नवीन मोहीमेस आरंभ करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते यशवंत किल्लेदार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

Protected Content