बिलखेडा येथील रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील बिलखेडा येथील रेशन दुकानदार यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे निवेदन ग्रामस्थांनी प्रभारी  तहसीलदारांना दिले आहे.

 

या संदर्भात प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आले की, गावातील रेशन दुकानदार हे गरीब व गरजू लोकांना नाहक त्रास देण्याचे काम करतात. शासकीय योजना प्रमाणे नागरिकांना रेशन देत नाही. काही वेळेस पूर्ण महिन्याचा कोटा हा परस्पर गायब होतो. रेशन आल्यावर मर्जी प्रमाणे वाटतात. शासनाच्या दर पत्रका प्रमाणे कधीही वाटप करीत नाही. कोरोना काळातील रेशन बर्‍याच वेळा मिळाले नाही. कोरोना काव्यतील मोफत रेशन देताना वाहतुकीचा खर्च वसूल केला गेला याबाबत बिलखेडा येथील सरपंच चंदु काटे यांनी सुध्दा रहिवासी म्हणून दुकानदारास समज दिली परंतु त्यांचे सुध्दा एकले नाही. तसेच दिवाळीत सुध्दा मिळणारा आनंदाचा शिधा वाटप मिळालाच नाही.

 

दरम्यान, या संदर्भात कोणी दुकानदार वाला जाब विचारल्यास ते नागरिकांना, गरीब जनतेला धमकीवजा शब्दात बोलतात की, माझे राजकीय क्षेत्रात फार वजन आहे. मी तालुका पातळीवरील सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहे, कुठेही जा, कुठेही माझी तक्रार करा. माझे कोणीच काही वाकडे करून घेणार नाही, अशी अरेरावीची भाषा दुकानदार वापरतात अश्या आपयाचे निवेदन गावकर्‍यांनी धरणगाव तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना दिले असून अश्या बेशिस्त, व शासनाची प्रतिमा मलिन करणार्‍या दुकानदारवर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

 

निवेदनावर बिलखेडा येथील रहिवासी विकास भदाणे, भाऊसाहेब बाविस्कर, संजय पाटील, प्रताप बडगुजर, संदीप पाटील, हिलाल पाटील, संगीता भिल, इंदुबाई भिल, सरलाबाई भिल, सुशिलाबाई भिल, मिनाबाई भिल, सोनाली भदाणे, जयश्री मगर, निलाबाई भिल, पुष्पाबाई बाविस्कर, विमलबाई पाटील, छायाबाई बाविस्कर, सुरेखा बडगुजर, रमेश भदाणे, सुनील पाटील आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत. तरी तहसील कार्यालय पुरवठा विभागाने या रेशनिंग दुकानावर त्वरित कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Protected Content