कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक दिनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा कनिष्ठा महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या न्याय मागणीची पुर्तता करण्याची मागणी करण्यात आली होती. अद्यापपर्यंत शासनाकडून संघटनेसोबत चर्चा करण्यात आली नसल्याने त्यांच्या मागण्या पुर्ण झालेल्या नाही. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने करून शासनात वेळोवेळी निवेदने दिली आहेत. शासनाने मागण्या मान्य करूनही त्यांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. एकेका मागणीसाठी राज्यातील शिक्षक गटागटाने वारंवार आंदोलने करीत आहेत. तर महासंघाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या एकत्रितपणे मांडलेले आहेत. आपण सोबत जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांबाबत महासंघाशी चर्चा करून सकारात्मक निर्णयाने शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे, जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनिल सोनार, राजेंद तायउे, राजेश बडगुजार, सुनिल पाटील, पी.पी.पाटील, संजय पाटील, जी.एच.वंजारी, शरद पाटील, अतुल इंगळे, राजेश भटनागर यांच्यासह महिला शिक्षीका आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/646442333341335

Protected Content