एकनाथराव खडसेंची सुरक्षा व्यवस्था काढून घ्या- मालपुरेंची मागणी

eknath khadse

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाराव खडसे हे आता कोणत्याही संवैधानिक पदावर नसल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी राज्यापलांकडे केली आहे.

या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गजानन मालपुरे यांनी एक निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथराव गणपतराव खडसे हे आज रोजी आमदार, मंत्री किंवा कोणत्याही शासकीय निमशासकीय उच्च पदावर नसल्याचे माझे माहिती प्रमाणे ज्ञात आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे अनेक राजकीय लोकप्रतिनिधींच्या अवास्तव सुरक्षा व्यवस्था कमी करत असल्याचे वृत्त वाहिन्यातुन समजत आहे. यामुळे आज खडसे हे कोणत्याही पदावर नसतांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था दिल्यामुळे शासनाचा खर्च होत आहे. याची दखल घेऊन या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी. एकनाथराव खडसे यांना सुरक्षा व्यवस्था गरजेची नसल्यास तातडीने सुरक्षा व्यवस्था कमी किंवा काढुन घेण्यात यावी. जेणेकरुन शासनावर विनाकारण पडणारा आर्थिक बोजा येणार नाही. तसेच त्यांच्या सुरक्षेवर असणारे पोलीस कर्मचारी अन्य ठिकाणी वापरता येतील. या सर्व बाबींची दखल घेऊन आपण लवकरात लवकर या प्रकरणी निर्णय घ्यावा ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Protected Content