मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती

patil 1

 

भुसावळ प्रतिनिधी । नवी दिल्ली केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखा अंतर्गत भुसावळ तालुका कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली असून अध्यक्षपदी नाना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी उज्ज्वला बागुल आणि संतोष माळी यांची निवड करण्यात आली आहे.

नाना पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अध्यक्षस्थानी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. अजय पाटील, सचिव राजेश पोतदार, जिल्हा संघटन सचिव प्रा. बी. जी. माळी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा सचिव राजेश पोतदार यांनी केले. उज्जैनकर यांनी संघटनेचे कार्य व उद्देश याविषयी माहिती दिली. यावेळी सर्वानुमते तालुका कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

ती पुढील प्रमाणे :-
अध्यक्ष नाना पाटील, उपाध्यक्ष उज्ज्वला बागुल (पत्रकार), संतोष माळी, सचिव लिना अहिरे, महासचिव प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष नारायण तारापुरे (सोनार), शोभा चौधरी, संघटन मंत्री सुनिल वानखेडे, दिपक मराठे, सहसचिव निलेश फिरके, सुनील चौधरी, प्रसिध्दी प्रमुख डॉ. जगदिश पाटील, महिला प्रतिनिधी राजश्री देशमुख, कायदेशीर सल्लागार ऍड.एस.आर.सोनार, ॲड.जास्वंदी भंडारी, सदस्य रमेश चौधरी, पवन अनासुने, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवचरण उज्जैनकर, प्रा. अजय पाटील, राजेश पोतदार, प्रा.बी.जी.माळी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. बैठकीस मराठे, निशांत पाटील, ओम तारापुरे आदि उपस्थित होते.

Protected Content