कोलकाता वृत्तसंस्था । कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालेली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. गुलाबी चेंडूवर भारतीय संघ पहिल्यांदाच क्रिकेट खेळणार असल्यामुळे या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी होतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारताने संघात कोणतेही बदल केलेले नाहीयेत.