राजकारणात नवीन व्हायरस; लागण झाल्यानंतर होतात आरोप सुरू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2 A’या मार्गाचे लोकापर्ण संपन्न झाले. याप्रसंगी राजकारणात एक नवीन साथ आली असून या व्हायरसची लागण झाल्यानंतर आरोप सुरू होतात. एकतर इतरांनी केलं नाही, जे केलं ते आम्हीच केलं आणि इतरांनी नवीन केलं तर त्यात भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारत असल्याचे दिसतात.” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे.

“विविध माध्यमातून राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका घेत नाही. संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका.” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि केंद्र सरकारला इशारा दिला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Protected Content