घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड

dadad

जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे येथील न्यायालयाने आज आपला निकाल घोषीत केला असून हायात असलेल्या सर्व 48 आरोपींना दोषी ठरविले आहे. त्यापैकी प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयूर, मुख्याधिकारी पी.डी. काळे, जगन्नाथ वाणी, सुरेश जैन यांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे तसेच सुरेश जैन यांना 100 कोटी रूपयांचा तर मयूर व वाणी यांना प्रत्येकी 40 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.

हाती आलेल्या निकालानुसार घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा व 100 कोटी रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्यासोबत राजेंद्र मयूर 7 वर्ष, 40 कोटी दंड, जगन्नाथ वाणी 7 वर्ष, 40 कोटी दंड, प्रदिप रायसोनी 7 वर्ष, 10 लाख रूपये दंड तर तत्कालिन मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना 5 वर्षे, 5 लाख दंड, माजी मंत्री गुलाबराव देवकर 5 वर्षे शिक्षा व 5 लाख रूपये दंड याशिवाय याशिवाय आरोपी क्रमांक 6 ते 15 व 17, यात महेंद्र सपकाळे, अशोक सपकाळे, चुडामण पाटील, अफजल खान पटवे, शिवचरण ढंढोरे, चंद्रकांत सोनवणे, सरस्वती कोळी, चंद्रकांत कापसे, विजय वाणी, अलका राणे, डिगंबर वाणी यांना तसेच 43 ते 51 आरोपींमध्ये अलका लढ्ढा, ममताजबी खान, सुनंदा रमेश छाडेकर, मीना अमृतलाल मंधान, रेखा चत्रभुज सोनवणे, भागीरथी बुधो सोनवणे, मीना अनिल वाणी, पुष्पलता शालीग्राम अत्तरदे, विजय पंडीतराव कोल्हे या सगळ्यांना 4 वर्षांची शिक्षा व प्रत्येकी 1 लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय काही आरोपींच्या दंडाची रक्कम वाढण्याची शक्यताही आहे. आरोपी क्रमांक 16 पुष्पा प्रकाश पाटील यांना प्रकृतीच्या कारणावरून जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना सर्वात कमी म्हणजे 3 वर्ष शिक्षा व 1 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

Protected Content