जळगावच्या संजय पाटीलच्या कोपरगावात साडी नेसून चोऱ्या !

 

शिर्डी वृत्तसंस्था । सहा महिन्यांपासून कोपरगावातील  एकाच परिसरात चोऱ्या करणारा शातीर चोर अखेर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून तो चोरी करताना चक्क साडी घालायचा.

कोपरगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत या आरोपीला बेड्या ठोकल्या. हा चोर मूळचा जळगाव जिल्हयातील शिवाजीनगर येथील असून संजय पाटील असं त्याचं नाव आहे.

काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील ठराविक परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुकानातील रोख रक्कम तसेच साहित्यांची चोरी करणारा भामटा पोलिसांना आव्हान देत होता. हा चोर साडीच्या दुकानातून साडी अंगावर पांघरून चोरी करत होता. दुकानात प्रवेश करण्यासाठी त्याला उंच जाळ्यांवर सहज चढण्याची कला अवगत केली होती. तसेच चक्क साडी अंगावर पांघरून तो चोरी करत होता.

Protected Content