जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदि सतगुरु सुखरामजी महाराज यांच्या मोक्ष तिथी उत्सवानिमित्त आयोजित सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता झाली आहे. या निमित्ताने सकाळी पदभ्रमण, भजन, सत्संग आणि प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
आदि सतगुरु सुखरामजी महाराज यांच्या परमोज तिथी निमित्ताने १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सात दिवसांचा अखंड राम नामस्मरण कार्यक्रम रामद्वारा (जगतपाल), आकाशवाणी चौक येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी मोक्ष तिथी उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजता हॉटेल क्रेझी होम येथून पदभ्रमण काढण्यात आले.

सकाळी १०.३० वाजेपर्यंत राम नामाचे भजन करण्यात आले. यानंतर सत्संग आणि आभार प्रदर्शनानंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान आध्यात्मात राम नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट करत विविध विषयांवर उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला जगतपाल चांडक गुरुजी, डॉ. अनमोल चांडक, प्रशांत सावदेकर सर, नाना महाजन, आर. सी. नाना, ललित बडगुजर, राजू पाटील, जितू पाटील, भागवत कोळी, जगदीश श्रीखंडे, सुदर्शन पाटील यांच्यासह रामस्नेही कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती आयोजकांतर्फे राजू सूर्यवंशी यांनी दिली.
आदि सतगुरु सुखरामजी महाराज यांच्या मोक्ष तिथी उत्सवानिमित्त पदभ्रमण, भजन आणि सत्संगासह अखंड राम नामस्मरण सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात व भक्तीभावात करण्यात आली.



