खा. खडसे यांच्या प्रयत्नांनी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे

rksha khadase

जळगाव प्रतिनिधी । आषाढी एकादशी निमित्ताने माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी व भाविकांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन
करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी 11 जुलै रोजी भुसावळवरून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेचे आयोजन माजी महसूलमंत्री आ. एकनाथरावजी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार रक्षाताई खडसे यांनी केले आहे. ही रेल्वे सकाळी 9:15 मिनिटांनी भुसावळ येथून निघेल व पंढरपूर येथे रात्री 10:10 मिनिटांनी पोहोचेल, तिच रेल्वे 12 जुलैच्याच रात्री 9:50 मिनिटांनी पंढरपूर येथून सुटेल तर 13 जुलै रोजी दुपारी 2:40 मिनिटांनी भुसावळ येथे पोहचणार आहे. वारकरी व भाविकांनी या ट्रेनचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आव्हान खासदार रक्षाताई खडसे यांनी केले आहे.

Protected Content