एरंडोल प्रतिनिधी । जळगाव येथील सामाज सेवेची आवड असणा-या स्मिता पाटील यांनी जय भवानी मित्र मंडळ यांना प्रेरीत करून त्यांचेकडून खडके बु. येथिल अनाथ, निराधार मुलांना आणि मुलींना शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे उपयोगी साहित्य देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्यमध्ये स्कुल बॅग, नोटबुक, वॉटर कलर, पेन, रबर, शॉपनर इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले. स्मिता पाटील यांनी अनाथ मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना अभ्यासाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. बालकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील अनाथ वसतिगृह असुनही वस्तीगृचा परिसर स्वच्छ, आनंददायी व उत्तमरित्या कामकाज सुरू असल्याने समाधान व्यक्त करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जय भवानी मित्र मंडळ जळगाव यांचे अनमोल सहकार्य संस्थेस लाभल्याने बालकांना शैक्षणिक सुविधा मिळण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, अधिक्षक मधुकर कपाटे यांनी यावेळी आभार मानले.