बियाणी स्कुल मध्ये नाताळ निमित्त कार्यक्रम

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथिल बियाणी स्कूल इंग्रजी माध्यम मध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी माध्यम मध्ये आज दि. २३ रोजी नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी बियाणी एज्युकेशन गृपच्या सेक्रेटरी डॉ.सौ. संगीता बियाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थी विद्यार्थिनींनी मसीहा येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा प्रसंग अतिशय रोचक पद्धतीने सजीव देखावा प्रदर्शित करून सर्वांना मोहित केले. तसेच या वेळी सर्व विद्यार्थ्यांना संता क्लोज ने चॉकलेट देऊन नृत्य केले.

तसेच कार्यक्रमाच्या समारोपात शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले.

Protected Content