Home प्रशासन तहसील यावलचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण ‘जीनियस आदर्श अधिकारी’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित! 

यावलचे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण ‘जीनियस आदर्श अधिकारी’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित! 

0
8


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फिरोज खान अमानुल्ला खान पठाण यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांना ‘जीनियस राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत “जीनियस आदर्श अधिकारी” या अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले आहे.
जामनेर येथील एकलव्य शाळेच्या सभागृहात या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन आणि आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पठाण यांनी यावल पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या याच सामाजिक आणि शैक्षणिक बांधीलकीची दखल जामनेर येथील ‘जीनियस मास्टर्स फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आली.
या सोहळ्याप्रसंगी जीनियस मास्टर्स फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव नामदेव पाटोळे, उपाध्यक्ष जनार्दन लोखंडे, सहसचिव किरण पाटील, ज्येष्ठ सल्लागार किशोर काळे, कोषाध्यक्ष संदीप पाटील, संघटक राहुल महाजन, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांच्या या बहुमानाबद्दल आणि राज्यस्तरीय पातळीवर मिळालेल्या पुरस्कारामुळे यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे.

Protected Content

Play sound